Take a fresh look at your lifestyle.

लव्हाळा व्यवस्थापन करताना ‘या’ गोष्टी करा!

0

लव्हाळा हे बहुवार्षिक तण आहे. ऊस, सोयाबीन, मका, कापूस, भात, फळबागा यासारख्या पिकांमध्ये ते अधून येते. याच्या प्रादुर्भावाने २०-९० टक्क्यांपर्यंत उत्पन्नामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. लव्हाळा शाखीय पद्धतीने वाढते. त्याच्या गाठी जमिनीत असतात त्यांना नागरमोथे देखील म्हणले जाते. दरम्यान खुरपणी झाली तरी नागरमोथे खोलवर जमिनीमध्ये जिवंत राहतात. त्याच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाले की हे तण झपाट्याने वाढते. त्यामुळे खालील पद्धतीने व्यवस्थापन करा, फायदा होईल.

असे करा व्यवस्थापन :

▪️ उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करा. यामुळे जमिनीतील नागरमोथे उघडे पडतील. त्यानंतर एक ते २ वेळा कोळपणी करा.
▪️ पीक फेरपालट, सेंद्रिय मल्चिंग, आंतरपीक सारख्या पीकपद्धतीने सुद्धा तणाचे व्यवस्थापन करता येते.
▪️ सोयाबीनमधील लव्हाळा नियंत्रणासाठी सिंजेंटा – फ्युजीफ्लेक्स – ४०० मिली किंवा युपीएल आयरिश ४०० मिली किंवा ड्यूपॉन्ट क्लोबेन १५ ग्राम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा.

पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती? पीक कर्ज योजना | Krushi doot | Crop Loan Yojana


▪️ ऊसातील लव्हाळा नियंत्रणासाठी धानुका सॅम्प्रा ३६ ग्रॅम याची प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा. सॅम्प्रा तणनाशक फवारल्यानंतर ८ दिवस जमिनीची मशागत करू नका. दरम्यान महिनाभर आंतरपीक म्हणून काही लावू नका.
▪️ भातामध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास बायर सनराईज ४० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करा. फवारणीनंतर २४ तासांनी पिकात पाणी सोडा.
▪️ तसेच तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर पिकावर पिवळेपणा येऊ शकतो त्यासाठी चिलेटेड झिंक १५ ग्राम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करा.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.