Take a fresh look at your lifestyle.

Crop Insurance : गहू, हरभऱ्याचा पीकविमा भरण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत

0

Crop Insurance चालू वर्षी रब्बी हंगामात (Rabi Season) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गहू आणि हरभरा या पिकांसाठी गुरुवार १५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना विमा अर्ज (Crop Insurance) दाखल करता येतील, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी ही कामे उरकावीत.

Crop Insurance पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यांसारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Crop Insurance शेतकरी अर्ज, विमा हप्ता सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) ऑनलाइन पद्धतीने निःशुल्क भरू शकतात. परभणी जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे. प्रतिहेक्टरी विमाहप्ता दर गहू बागायती ६३० रुपये, हरभरा पिकासाठी ५६२ रुपये ५० पैसे, तर उन्हाळी भुईमुगासाठी ६४४ रुपये ५७ पैसे आहे.

हेही वाचा : नाद खुळा! दूध व्यवसायातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला दीड कोटींचा नफा..

Crop Insurance योजनेत सहभागी होण्यासाठीची कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत गहू बागायत आणि हरभरा या पिकासाठी गुरुवार (ता. १५)पर्यंत, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२३ ही आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे.
Crop Insurance अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues