Take a fresh look at your lifestyle.

Cotton Rate | कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! जागतिक बाजारात यंदा कापूस राहणार तेजीत!

0

Cotton Rate : खरीप हंगामात (Kharif Season ) प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे कापूस होय. खरीप हंगामात शेतकरी कापूस लागवडीवर Cotton मोठ्या प्रमाणात भर देतात.

मात्र, यंदा कापसाचे उत्पादन (Cotton production) सरकारच्या उदिष्टापेक्षा कमी राहिले आहे. ते यंदा जागतिक बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) तेजीत राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Cotton Rate : कापूस उदिष्ट व दर
सध्या कापसाला बाजारात चांगला भाव मिळत आहे. याच कारणामुळे यंदा कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते असा अंदाज आहे. यंदा देशात कापसाखालील सरासरी क्षेत्र 126 लाख हेक्टर इतके आहे. तसेच 26 ऑगस्टपर्यंत 124 लाख 50 हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. परंतु सरकारने यंदा 370 लाख कापूस लागवडीचे उद्दिष्ट आहे. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही.

Cotton Rate : यंदा कापूस का राहणार तेजीत?
अमेरिका देश सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश आहे. तर यंदाच्या दुष्काळाचा अमेरिकेतील पिकाला देखील फटका बसत आहे. यामुळेच यंदा कापसाचे उत्पादन कमी होऊ शकतो. म्हणूनच कापसाचा साठा कमी होऊ शकतो आणि जागतिक बाजारात निर्यात देखील कमी होऊ शकते. म्हणूनच कापसाचा साठा कमी असल्याने जागतिक बाजारात कापसाचे दर तेजीत राहू शकतात. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues