Take a fresh look at your lifestyle.

कापुस पातेगळची समस्या आहे? मग ‘हे’ उपाय करा!

0

सध्याचे बदलते हवामान पाहता परिणाम पिकांवर होत असून त्याच्या अन्नसाखळीत खंड पडतो आहे. कारण यामुळे जमिनीतील मूळ हे अन्नद्रव्ये घेऊ शकत नाही परिणामी नैसर्गिकरीत्या कापसाच्या किंवा कोणत्याही पिकाची पातेगळ होते. असे होऊ नये म्हणून खालील उपाय तुम्हाला मदत करतील…

अशावेळी तुम्ही planofix ४ ते ५ मिली प्रती पंप कोणत्याही गरजेनुसार कीटकनाशकांसोबत फवारणी करू शकता.

सद्यस्थितीत सुरु असलेला पावसाने फुलात पाणी साचून बुरशी तयार होते त्यामुळे फुलगळ होते ते थांबविण्यासाठी bavistin हे बुरशीनाशक १५-२० ग्राम प्रती पंप कोणत्याही गरजेनुसार कीटकनाशकांसोबत फवारणी करा. त्याचप्रमाणे जमिनीत पाणी साचू न देता त्याला जमिनीच्या उतारानुसार बाहेर काढा.

हवामानास आवश्यक घटक :

● कमी सुर्यप्रकाश, तापमान वाढलेले , पावसाचा खंड/ जमीनीत नसलेली ओल, ढगाळ हवामान आदी घटकांमध्ये विपरीत बदल झाल्यामुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकाचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे वहन होण्यास अडथळा येऊन परिणामी गळ होते.
● वाढलेले तापमानामुळे किंवा उमलणाऱ्या फुलांवर पडणाऱ्या पाऊसामुळे परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही. तसेच फुलांवरील किडी इ. मुळे पाते फुलांची गळ होते.
● तसेच उशीरा लागवड झालेल्या पिकामध्ये गळ होण्याचे प्रमाण अधिक आढळते.
● कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाची दीर्घकाळ उघडीप आणितापमानात झालेली वाढ यामुळे देखील पातेगळ होते.

‘या’ कारणांमुळे पाते, फुले व बोंडांची गळ होते. : जुन-जुलै महिन्यात महाराष्ट्रात लागवड होत असते. सुरुवातीच्या काळात पाते लागण्याच्या वेळी जुलै -ऑगस्ट महिन्यात ढगाळ हवामानामुळे पिकास पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. तसेच बोंडे लागण्याच्या काळात ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे ओल देखील कमी होते.

पाणी जमिनीत साचू नये म्हणून जमीन उत्तम निचऱ्याची असू द्या. फुले लागण्याच्या अवस्थेत अधिक तापमान, ढगाळ हवामान किंवा पावसाचा खंड येणार नाही अशाप्रमाणे लागवड करा.

पाणी जमिनीत साचू नये म्हणून जमीन उत्तम निचऱ्याची असू द्या. फुले लागण्याच्या अवस्थेत अधिक तापमान, ढगाळ हवामान किंवा पावसाचा खंड येणार नाही अशाप्रमाणे लागवड करा.

विद्राव्य खते वापरा :
● पाते – बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये डि. ए. पी किंवा युरिया खताची 2% (200 ग्रॅम / 10 लिटर) प्रमाणात फवारणी करा.
● फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पोटॅशिअम नायट्रेट (13:0:45) 2% प्रमाणात फवारणीद्वारे द्या.

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues