Take a fresh look at your lifestyle.

या अधिकृत अँपवर नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस उपलब्ध; कशी करायची नोंदणी वाचा सविस्तर

0

चीनमध्ये कोरोना महामारीचे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्याने वाढू लागल्याने सध्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या भीतीदायक आकडयांमुळेच संपूर्ण जगात पुन्हा लॉकडाउनची परिस्थिती उद्भवणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आताच्या घडीला कोरोनाच्या नव्या BF7 व्हेरीयंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकजण बुस्टर डोसकडे वळत आहेत. बुस्टर डोसमध्ये आता नेजल व्हॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचा समावेश करण्यात आला आहे. ही लस आता ‘कोवीन अ‍ॅप’वर उपलब्ध झाली असून ही लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची ते सविस्तर जाणून घेऊया…

नेजल व्हॅक्सिन बुक करण्यासाठी वापरा हि सोपी पद्धत

▪️ सर्वप्रथम तुम्ही cowin.gov.in/ या कोविनच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
▪️ त्यानंतर तुमच्या रेजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईलवरून लॉगिन करा.
▪️ यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.
▪️ लॉगिन झाल्यानंतर व्हॅक्सिन स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर उपलब्ध बुस्टर डोस या पर्यायावर क्लिक करा.
▪️ पिनकोड, जिल्ह्याचे नाव टाकून जवळचे व्हॅक्सिन सेंटर शोधा.
▪️ तुम्हाला सोयीचे असेल ते सेंटर निवडा.
▪️ त्यानंतर तुम्हाला हवी ती तारीख आणि दिवस निवडा.
▪️ तुमचा स्लॉट कन्फर्म करा. बुस्टर डोस घेतल्यानंतर वेबसाईटवरून त्याचे सर्टीफिकेट डाउनलोड करा.

दरम्यान, बुस्टर डोस घेण्याआधी त्या व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. या दोन लस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी एखादी व्यक्ती बुस्टर डोस घेऊ शकते.

मोठी बातमी : देशात पुन्हा कोरोनाची कडक गाईडलाईन्स व मास्क सक्ती होण्याची शक्यता!!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues