Take a fresh look at your lifestyle.

chetan sharma sting Operation : किंग कोहलीला कर्णधार पदावरून हटवणारा खरा ‘मास्टरमाइंड’ कोण? स्टिंग ऑपरेशनमधून थेट नाव आलं समोर

0

chetan sharma sting Operation : आपल्या पैकी सर्वांना माहिती आहे कि…. भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली याचं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं. कर्णधार पदावरून हटवण्यापूर्वी दीड तास आधी विराटला याची कल्पना देण्यात आली होती. याचा खुलासा खुद्द विराट कोहलीने पत्रकार परिषद घेत केला होता. विराट कोहलीला असं अचानक कर्णधारपदावरून हटवल्याने क्रिकेटविश्वाला धक्का बसला होता. पण विराटला कर्णधार पदावरून हटवणारा खरा मास्टरमाइंड कोण होता? याचा खुलासा आता एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार.., बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचं ‘झी न्यूझ’ने स्टिंग ऑपरेशन केलं आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विराट कोहलीला कर्णधार पदावरून कसं हटवण्यात आलं, याच्या मागील पार्श्वभूमीही सांगितली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याबरोबर विराट कोहलीचा वाद होता. या वादातूनच विराटला कर्णधार पदावरून काढण्यात आलं, असा दावा चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केला आहे.

एवढेच नव्हे तर, याबाबत बोलतांना चेतन शर्मा पुढे म्हणाले कि – कोहली आणि गांगुली यांच्यात अहंकाराचा वाद होता. स्वत:चं कर्तृत्व क्रिकेटपेक्षा मोठं आहे, असं विराटला वाटत होतं. यामुळे दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली असल्याचे चेतन शर्मा म्हणाले..

चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट आणि रोहित यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. दोघांमध्ये कसलाही वाद नसून विराट आणि रोहित दोघं एकमेकांना चांगली साथ देतात. दोघांत वाद असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात. पण विराटचा फॉर्म खराब असताना रोहितने त्याला चांगली साथ दिली होती. तर रोहितचा फॉर्म खराब असताना विराटही त्याला साथ देत होता, असा दावा चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केला आहे.

टीप : दरम्यान – संबंधित वरील बातमीमधील दाव्याची पुष्टी ‘कृषिदूत’ करत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues