Take a fresh look at your lifestyle.

स्वतःचा व्यवसाय सुरु करा; केंद्र सरकार देईल 10 लाखांचे कर्ज!

0

जर तुम्हाला असे वाटत आहे कि, स्वतःचा व्यवसाय सुरु करायला हवा तर तर तुमच्यासाठी एका खास सरकारी योजना आहे. ती म्हणजे ‘पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना. ही एक केंद्र सरकारची योजना आहे. याअंतर्गत बिगर शेती आणि बिगर कार्पोरेट सुक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते. तब्बल दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. ते कसे मिळवायचे? याबाबत जाणून घेऊयात…

PMMY मुद्रा कर्ज फायदे जाणून घ्या! :

● उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
● कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक नसते. याव्यतिरिक्त, मुद्रा कर्जात कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
● विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणून, कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात.
● मुद्रा कर्जाची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
● कमीत-कमी कर्जाची रक्कम असे काही नाही.

कर्ज रकमेवर (पीएमएमवाय योजने अंतर्गत) अवलंबून खालील तीन प्रकारची मुद्रा कर्जे आहेत

शिशु : ५०,०००/- रुपयांपर्यंतची कर्ज मंजूर होऊ शकते.
किशोर : ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत मंजूर होऊ शकते.
तरुण : ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.

दरम्यान प्रक्रिया शुल्क किशोर आणि शिशु कर्जासाठी ० तर तरुण कर्जाचा ०.५ टक्के रक्कम हे प्रक्रिया शुल्क वेगवेगळ्या बँकांनुसार आकारले जातात.

कर्जाचा परतफेड कालावधी किती असेल? : जर तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले, तर कर्ज घेतल्यापासून ३ ते ५ वर्ष हा कर्ज परतफेड कालावधी असेल.

पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती? पीक कर्ज योजना | Krushi doot | Crop Loan Yojana

कर्ज लाभार्थी पात्रता : लघु उद्योग व्यवसाय मालक, फळ आणि भाजी विक्रेते, पशुधन दुग्ध उत्पादक, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, विविध शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार, कारागीर.

आवश्यक कागदपत्रे : ओळख पुरावा (आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स), पत्त्याचा पुरावा (विज बिल किंवा गॅस बिल किंवा नळपट्टी बिल किंवा टेलिफोन बिल), व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र.

असा करा ऑफलाईन अर्ज :

● अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या वित्तीय संस्थेकडे (बँकेत) जा.
● आपण जवळ-जवळ सर्व आर्थिक संस्थांमध्ये मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकता.
● बँकेत गेल्यानंतर कर्ज अर्ज भरा. आपला वैयक्तिक व व्यावसायिक तपशील द्या.
● मुद्रा मंत्रालय कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा? हे जाणून घेण्यासाठी त्यांना किती रक्कम द्यायची आहे? ते देखील तपासून घ्या.
● बँक तुम्हाला मुद्रा लोन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय पुरवले जातील. त्यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण असे तीन पर्याय दिसतील. त्यातील तुमच्या व्यवसायानुसार योग्य पर्याय निवडून कर्ज घेऊ शकता.
● या पद्धतीने तुम्ही योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकता आणि व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळवू शकता.

असा करा ऑनलाईन अर्ज :

● सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
● आता मुख्यपृष्ठ समोर येईल.
● मुख्य पृष्ठावरील लॉगिन बटणावर क्लिक करा.
● आता आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल. ज्यामध्ये आपल्याला आपले वापरकर्तानाव, संकेतशब्द आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
● आता लॉगिन बटणावर क्लिक करा.
● आता आपण मुद्रा पोर्टलवर लॉगिन करण्यात सक्षम आहात.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues