Take a fresh look at your lifestyle.

ऊसाला तुरा येण्याची कारणे; तुरा आल्यामुळे काय परिणाम होतात आणि त्यावरील उपाय

0

1) तुरा येण्याचे प्रमाण हे त्या ऊसाच्या जातिच्या अनुवांशिक गुणांवर अवलंबून असते.
2) तुरा येण्यासाठी 12:30 तासांचा दिवस व 11:30 तासांची रात्र असा प्रकाश कालावधी असल्यास.
3) ज्या वर्षी पावसाचे प्रमाण आँक्टोंबर व सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त असते त्या वर्षी तुऱ्याचे प्रमाण जास्त असते.
4) दिवसाचे तापमान हे 26-28℃ व रात्रीचे तापमान हे 22-23℃ असल्यास.
5) हवेतील आद्रतेचे प्रमाण (65-90%) व जमिनीतील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास.
6) नत्राचे शोषण ऊस पिकाकडुन कमी झाल्यास तुरा येतो.

तुऱ्यामुळे ऊसावर होणारे परिणाम :

1) तुरा आल्यावर ऊसाची वाढ पुर्णपणे थांबते व ऊसाची पक्वता वाढत जाते.
2) सुरु ऊस जो डिसेंबर ते फेब्रुवारी/मार्च पर्यंत लावला जातो त्या ऊसास तुरा आल्यामुळे त्यांची शाकिय वाढ होत नाही परिणामी उत्पादन व साखर उताऱ्यात घट होते.
3)तुरा येण्यास सुरुवात झाल्यावर त्याची पाने अरुंद होतात व पिवळी पडण्यास सुरुवात होते.
4)पानांचे क्षेत्रफळ कमी होते त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते.
5) पोंग्यामधील कोंबाची वाढ थांबते.
6) तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये 1.5 ते 2 महिन्यांच्या पुढे राहिला तर ऊस पोकळ पडण्यास सुरुवात होते.
7) परिणामी साखरेचा उतारा 18-20% पर्यंत घट होते

उपाय योजना :

1) तुरा आलेल्या ऊसाची तोडणी लवकर करावी.
2) ऊसाची लागवड शिफारस केलेल्या हंगामात व वेळेत करावी.
3) पावसाळ्यात ऊसाच्या शेतात पाणी साठुन राहणार नाही याची काळजी घ्यावी.

खूशखबर! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 5 लाख सौर पंपांचे होणार वाटप

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues