Take a fresh look at your lifestyle.

गाईच्या प्रसूतीनंतर वार अडकण्याची कारणे व उपाय

0

वार अडकण्याची कारणे-
1) गाईचा गाभण कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच गाई व्यायल्यास.
2) गाई कमी वयाची किंवा पहिल्या वेताची असल्यास.
3) गाईच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन किंवा गर्भाशयाचा आजार असल्यास. 
4) गाईला योनीदाह किंव्हा गर्भाषयाचा दाह झाला असल्यास.
5) गर्भाशयाला पीळ पडल्यामुळे देखील वार अडकू शकतो.
6) गाई जास्त दिवस गाभण असल्यास किंवा जुळी वासरे झाल्यास.
7) गाईला सकस चाऱ्याचा, पशुआहाराचा खनिज मिश्रणाचा अभाव असल्यास.
8) गर्भाशयावर जास्त प्रमाणात ताण आलेला असल्यास.
9) गर्भाशयास कळांचा अभाव किंवा कष्ट प्रसूती झाली असल्यास.
10) गाईची वाहतूक केली असल्यास किंवा थकवा आला असल्यास.
11) नर वासरू असल्यास शस्त्रक्रिया करुन वासरू बाहेर काढल्यास वार अडकू शकतो.


उपाय-
1) वार पडत नाही म्हणून ओडून न काढता पशुवैद्यकाकडून गाठी सोडवून तो बाहेर काढावा.
2) गाईच्या योनीचा भाग निर्जंतुक ठेवावा.
प्रतिबंधात्मक उपाय-
1) गाई विण्याअगोदर एक महिना जीवनसत्वे अ आणि ई सेलेनियम तसेच क्षारांची इंजेक्शने द्यावेत.
2) गाभण काळात गाईंना भरपूर व्यायाम मिळायला हवा.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

लेखक :
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues