Take a fresh look at your lifestyle.

Business Idea For Startup : कुक्कुटपालनातून महिन्याकाठी मिळवा एक लाख रुपये, अशी करा सुरुवात krushi doot

0

Business Idea For Startup : तुमच्या मनात जर एखादा व्यवसाय करण्याचा मानस असेल आणि तो व्यवसाय करण्यासाठी तुमची कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर ‘हा’ व्यवसाय तुम्हाला महिन्याकाठी चांगला फायदा मिळवून देऊ शकेल. तो व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग (Poultry) पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही दरमहा 50 हजार ते 1 लाख रुपये मिळवू शकता. पोल्ट्रीचा व्यवसाय कमी दिवसांमध्ये लाखो रुपयांचा फायदा मिळवून देऊ शकतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला किमान 5 ते 8 लाख रुपये गुंतवणूक करण्याची गरज आहे. एवढ्या भांडवलात तुम्ही पोल्ट्री व्यवसाय सुरु करु शकता. अगदी सुरुवातीला देखील तुम्ही 1 हजार 200 ते 1 हजार 500 कोंबड्यापासून पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय सुरु करु शकता. याद्वारे तुम्हाला महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये मिळू शकतात.

Business Idea For Startup अशी कराल व्यवसायाची सुरुवात :
प्रथमतः पक्ष्यांच्या शेडसाठी आणि उपकरणांसाठी सुमारे 4 ते 5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. 1 हजार 500 कोंबड्यांचे गणित ठेवून काम सुरु करायचे असेल तर 10 -15 टक्के जास्त कोंबड्या तुम्हाला खरेदी कराव्या लागतील. कारण, रोगांमुळे पिलांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागणार आहे. कोंबड्यांना 20 आठवडे खाद्य द्यावे लागणार आहे. 20 आठवड्यांनंतर कोंबड्या अंडी घालण्यास सुरुवात करतात. त्यानंतर वर्षभर त्या अंडी घालतात. एक कोंबडी एका वर्षात सुमारे 300 अंडी घालले. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की 20 आठवड्यांनंतर त्यांच्या खाण्यापिण्यावर सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च होतील.

Business Idea For Startup 1 हजार 500 कोंबड्यांपासून दरवर्षी सरासरी सुमारे 4 लाख 35 हजार अंडी तयार होतात. यामध्ये जर 4 लाख अंडी विकली गेली आणि एक अंडे साडेतीन रुपये दरानं विकले गेले तर एका वर्षात अंडी विकून 14 लाख रुपये कमावता येतात. त्यामुळं या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. परंतू या व्यवसायात उतरण्यापूर्वी चांगले प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.