Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : देशात पुन्हा कोरोनाची कडक गाईडलाईन्स व मास्क सक्ती होण्याची शक्यता!!

0

जगात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा ससंर्ग वाढत असल्याचे समोर आलं असून मागील काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचं पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच उपाययोजना याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री भारती पवार म्हणाल्या :

चीन सह अनेक देशात कोरोना महामारीने पुन्हा हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी कोविड रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात (India) उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीत भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता देखील असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

तसेच या पार्श्वभूमीवर चीनमधून येणारे प्रवासी, पर्यटक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या.

Fitness : जिमला जाताय? मग वाचा या खास टिप्स…

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues