Take a fresh look at your lifestyle.

पशुपालकांसाठी मोठी घोषणा; ‘इतके’ लाख जिंकण्याची संधी!

0

एकेकाळी भारतीय शेती प्रामुख्याने पशुपालनासाठीओळखली जात. मात्र आता पशुपालन कमी होतानाचे चित्र आहे. देशातील वाढते यांत्रिकीकरण यास कारणीभूत आहे.

हा सगळा विचार करता देशातील पशुपालन करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक चांगली योजना आणली आहे. पशुपालनाला प्रोत्साहन मिळावे हा मागचा उद्देश आहे.

त्यानुसार दुग्ध व्यवसायात विशेष योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. कृत्रीम गर्भधारणा करणाऱ्या पशुसंस्थानचा सुद्धा यात समावेश असणार आहे.

त्यासाठी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. या माध्यमातून देशातील पशुपालकांना केंद्र सरका गुरं आणि जनावरं सांभाळण्यासाठी पाठबळ देण्याचा प्रयत्न आहे.

या पुरस्काराच्या पहिल्या क्रमांकासाठी 5 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 2 लाख रुपये दिले पुरस्कार दिले जाणार आहे. ही रक्कम थेट पशुपालकांना मिळणार असल्याने यासाठी अर्ज करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

या योजनेसाठी केंद्रिय डेअरी मंत्रालय अर्ज मागवत असून पशुपालक www.dahd.nic.in या लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.