Take a fresh look at your lifestyle.

Bhiwandi : भिवंडीत सुमारे १८ लाखांचा संशयित निमकोटेड युरियाचा साठा जप्त

0

भिवंडीमध्ये पोलिसांनी (Bhiwandi Police) सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त (Urea Stock Seized) केला आहे. नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तीन महिन्यांपूर्वी देखील नारपोली पोलिसांनी अशीच मोठी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये 18 लाख रुपये किंमतीचा निमकोटेड युरियाचा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भिवंडीतील गोदाम पट्ट्यात युरियाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीनुसार, पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील ज्योती कम्पाऊंड येथील गजानन ट्रान्सपोर्टच्या गोदामात संशयित युरियाचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह नारपोली पोलिसांनी संबंधित गोदमावर कारवाई केली.

यावेळी तेथील गोदामात 14 लाख 12 हजार 650 रुपये किंमतीचा खतांचा साठा आढळलाय. त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये 4 लाख 75 हजारांचा 99 हजार 350 किलो वजनाचा खताचा साठा जप्त केलाय. एकूण 18 लाख 87 हजार 650 रुपयांचा संशयित युरियाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यानं शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किंमतीत सातत्यानं वाढ होताना दिसतेय. त्याचा मोठा फटका सध्या शेतकऱ्यांना बसतो आहे.

Pulses Price : सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, डाळींचे भाव जैसे थे राहणार!

खतांच्या किमंती वाढल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणाम उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच बोगस खतांच्या निर्मितीच्या घटनाही सातत्यानं घडत आहेत. याचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. देशात शेतीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युरियाचा वापर केला जातो. पण अशा प्रकारे खतांची साठेबाजी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरते आहे.

Brocoli Farming : दोन मित्रांनी केला शेतीत चमत्कार, ब्रोकोली पिकातून वर्षाला 10 लाखांची कमाई

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues