Take a fresh look at your lifestyle.

पर्सनल लोन घेण्यासाठी बेस्ट पर्याय; जाणून घ्या व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क

0

सध्या पर्सनल लोन मिळवणे सोपे झाले आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ठीक नसेल तरीही बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) वैयक्तिक कर्ज देतात. कर्ज घ्यायचे म्हटले कि, प्रथम व्याजदर पाहिला जातो. तसेच प्रक्रिया शुल्क किती आहे? हे देखील पहिले जाते. दरम्यान पर्सनल लोनसाठी कोणते पर्याय बेस्ट आहेत? याची माहिती आज पाहूयात…

एसबीआय : या बँकेत कर्जाचा व्याज दर 9.60 टक्क्यांपासून ते 13.85 टक्क्यांपर्यंत आहे. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी ईएमआय 10525-11595 रुपये आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1.5 टक्क्यांपर्यंत किंवा ते कमाल 15,000 रुपयांच्या अधीन आहे.

एचएसबीसी बँक : या बँकेत 9.75 टक्के ते 15 टक्के वार्षिक व्याज दराने कर्ज उपलब्ध आहे. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10562-11895 रुपये असून प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1% पर्यंत आहे.

सिटीबँक : या बँकेत वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 9.99 टक्क्यांपासून ते 16.49 टक्क्यांपर्यंत असा आहे. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10621-12290 रुपये असून प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 3% पर्यंत आहे.

बँक ऑफ बडोदा : या बँकेत 10 टक्के ते 15.60 टक्के वार्षिक व्याज दराने वैयक्तिक कर्ज दिले जाते. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10624-12053 असून प्रक्रिया शुल्क 1000 ते 10000 रुपये इतके आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक : या बँकेचा व्याज दर 10.49 टक्क्यांपासून सुरू आहे. 5 लाखांच्या कर्जासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी EMI 10,809 रुपयांपासून सुरू असून प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 3.5% पर्यंत आहे.

एचडीएफसी बँक : या बँकेचा वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 10.50 टक्क्यांपासून ते 21 टक्क्यांपर्यंत आहे. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10747-13527 रुपये असून प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.5% पर्यंत किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपयांच्या अधीन आहे.

आयसीआयसीआय बँक : या बँकेचा व्याज दर 10.50 टक्क्यांपासून ते 19 टक्क्यांपर्यंत आहे. 5 वर्षांच्या कालावधीसह 5 लाखांच्या वैयक्तिक कर्जासाठी ईएमआय 10747-12970 रुपये असून प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.50 टक्क्यांपर्यंत आहे.

कोटक महिंद्रा बँक : या बँकेचा व्याज दर दरवर्षी 10.75% ते 24% पर्यंत व्याज दराने उपलब्ध आहे. 5 लाखांच्या कर्जासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी ईएमआय 10809-14384 रुपये असून प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.5% पर्यंत आहे.

टाटा कॅपिटल : या बँकेत कर्जावरील व्याज दर 10.99 टक्क्यांपासून सुरू होतो. 5 लाखांच्या कर्जासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी ईएमआय 10869 रुपयांपासून असून प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.75 टक्क्यांपर्यंत आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues