Take a fresh look at your lifestyle.

आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित व उत्तम पर्याय कोणते? जाणून घ्या तुमच्या फायद्याची बातमी

0

पैशांचे महत्त्व किती आहे हे आपण सर्वच जण चांगले जाणतो. म्हणूनच जितक्या लवकर आणि जितके जास्त पैसे बचत करणे किंवा गुंतवणूक करणे हे कधीही चांगले. कारण अडचणीच्या प्रसंगी आपण साठवलेले पैसेच आपल्या कामी येतो. आता तुम्ही विचार करत असाल कि, गुंतवणूक कुठे करावी? व तसेच किती करावी? याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. प्रत्येकाला याबाबत शंका असतात. परंतु चिंता नको, आज आपण जाणून घेऊया गुंतवणुकीची सुरुवात कुठून आणि कशी करावी.

कोणत्या योजनेत किती वेळानंतर पैसे दुप्पट होण्याची शक्यता असते?
1) पीपीएफ (PPF)

▪️ पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे.
▪️ पीपीएफमध्ये वर्षाला 7.1 टक्के दराने व्याज मिळतो
▪️ या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 10 ते 14 वर्षे लागू शकतात.

2) बँक एफडी (Bank FD)
▪️ RBI (Reserve Bank of India) ने रेपो रेट वाढवल्यावर FD च्या व्याज दरात बँकांनी आता वाढ केली आहे.
▪️ सध्या एफडीवर 7 टक्के व्याज मिळतो
▪️ या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यास कमीत कमी 12 वर्षे लागू शकतात

3) नॅशनल पेन्शन योजना (National Pension Scheme)
▪️ सर्व प्रथम या योजने अंतर्गत तुम्हाला खाते सुरू करावे लागेल
▪️ सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणारे हे खाते सुरू करु शकतात
▪️ या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 7.2 वर्षांचा कालावधी लागू शकतो

4) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificates)
▪️ एनएससी (NSC) म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एक लहान बचत योजना आहे.
▪️ या योजनेत 6.8 टक्के व्याज मिळतो
▪️ या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 10.50 वर्षांत पैसे दुप्पट होऊ शकतात


(टीप : बाजारातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याची जबाबदारी आम्ही घेत नाही.)

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues