Take a fresh look at your lifestyle.

गृहिणींनो ‘या’ सात व्यवसायात आहे संधी; कमवा बक्कळ पैसा!

0

कोरोनाने अनेकांने बेरोजगार बनवले. त्यामुळे सध्या छोटे-मोठे स्वतःचे उद्योग करण्याकडे कल दिसत आहेत. त्यातल्या स्रियांना घरच्या कामातून सवड काढून काहीतरी काम मिळावे अशी अपेक्षा असते. खास अशा महिलांसाठी आम्ही सात व्यवसायाच्या आयडिया घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळू शकते.

ऑनलाईन सेलिंग : तुम्ही इंटरनेटच्या मदतीने मार्केटमध्ये हवे ते विकू शकता. तुमच्या क्रिएटीव्हिटीने बनवलेले सामान जसे की, पेंटिंग्स, डिझायइनर कपडे, पर्स वेगैरे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकून बक्कळ पैसे मिळतात. किंवा इतरांचे सामान विकण्यास मदत करून देखील तुम्ही पैसे कमवू शकता.

ब्लॉगिंग : लिहिणं हा तुमचा छंद असेल तर तुम्ही ऑनलाईन ब्लॉग सुरू करू शकता. यामध्ये तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता. खाद्यपदार्थांपासून ते ट्रेक, स्पोर्ट, आर्थिक, सामाजिक राजकीय इत्यादी कोणत्याही विषयांवर ब्लॉगिंग सुरू करा. याद्वारे चांगले उत्पन्न सुरू होते.

Youtube Video : हा एक उत्तम कमाईचा पर्याय आहे. या माध्यमातून तुम्ही तुमचे चांगले कौशल्य जगाला शिकवू शकता. तुमच्या युट्यूब चॅनेलची जशी प्रसिद्धी होईल तसतसे युट्यूबकडून तुम्हाला उत्पन्न मिळणे सुरू होईल.

ब्युटी पार्लर : तुमच्या परिसरातील महिलांना तुम्ही घरातूनच पार्लर चालवताना पाहिले असेल. विश्वास ठेवा तुमचं काम चांगलं असेल तर, तुम्हाला हा व्यवसाय जबरजस्त उत्पन्न देणारा ठरतो. तुम्ही घरपोहोच सेवा देऊ शकता. तसेच लग्न व इतर कार्यक्रमांच्या ऑर्डर घेऊन चांगली कमाई करू शकता.

बेबी सेटिंग आणि प्ले वे स्कूल : नवरा-बायको दोघांनी नोकरी करण्याकडे प्राधान्य दिल्याने घराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. असे कपल आपल्या मुलांसाठी चाईल्ड केअर सेंटरच्या शोधात असतात. याचा फायदा गृहिणींनी घ्यायला हवा. तुम्ही बेबी सिटिंग आणि प्ले वे स्कूलचे काम करून चांगले पैसे कमवू शकता.

ट्युशन क्लासेस : नोकरीची संधी मिळत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही घरी शिकवणी घेऊन देखील पैसा कमावू शकतात. शालेय विद्यार्थ्यांची घरघुती/ ऑनलाईन शिकवणी घेता येईल. कोव्हिडमुळे सध्या हा व्यवसाय सर्व काळजी घेऊन करणे अत्यावश्यक आहे. याद्वारे दरमहा चांगले उत्पन्न येईल.

फॅशन डिझाइनर : हल्ली फॅशनेबल कपड्यांची क्रेझ तरुण-तरुणींमध्ये वाढत चाललीय. याचं ज्ञान असणाऱ्या गृहिणींना या बिझनेसमध्ये चांगली कमाईची संधी आहे. या क्षेत्राशी संबधीत शॉर्ट टर्म कोर्स करून तुम्ही काम सुरू करू शकता.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues