Take a fresh look at your lifestyle.

Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीचं महाराष्ट्रात इतकं वेड का? जाणून घ्या याबाबत रंजक कहाणी

0

Bailgada Sharyat ‘नाद एकच एकाच एक, बैलगाडा शर्यत’… रोजच सोशल मीडियावर स्क्रोल करताना अनेकदा बैलगाडा शर्यतीचे फुल्ल रांगडे व भन्नाट स्टाईल मधील रिल्स तुम्ही रोजच बघत असाल. परंतु मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचं नवे फॅडच आलंय. पण याच बैलगाडा शर्यतीचा वाद आजही कोर्टात सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीशी संबंधित कायद्याला आव्हान देण्यात आलं असून राज्यातील सर्वच बैलगाडा मालकांनी शर्यतीचा आग्रह धरून ठेवला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का नक्की ही बैलगाडा शर्यत असते तरी काय? तिची सुरुवात कशी झाली? कुठून झाली? कशी असते ही शर्यत?

Bailgada Sharyat बैलगाडा शर्यतीचा इतिहास व त्याची सुरुवात :

Bailgada Sharyat आपल्या सर्वांना माहिती आहे भारताला कृषिप्रधान देश म्हटलं जातं. शेतकऱ्याचं व त्याच्या पशूंचे एक वेगळं नातं पुरातन काळापासूनच आहे. शेतकऱ्याने बैलाचं संगोपन सुरु केलं तसंच आपल्या मनोरंजनासाठी देखील याचा वापर सुरु केला आहे. त्यातूनच निर्माण झालेला खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास 400 वर्षाची जुनी परंपरा असल्याचं जाणकार सांगतात. विशेषतः शेतातील हंगाम संपल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी जत्रा, उरूस भरवून याचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रात काही ठिकाणी बैलगाडा शर्यतीला छकडा किंवा शंकरपट असं सुद्धा म्हणतात.

Bailgada Sharyat या शर्यतीसाठी खिल्लार जातीच्या बैलांना विशेष मान असतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक बैलगाडा शर्यती या खेड, आंबेगाव, जुन्नर या भागात होतात. बैलगाडा हाच तिथल्या जनतेचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव बनला आहे.

कुठून झाली प्रथेला सुरुवात? :

Bailgada Sharyat 14 व्या शतकाच्या सुमारास ईशान्य स्पेनमध्ये बैलांसमोर धावण्याची परंपरा सुरु झाली. ‘एन्सिएरो ऑफ पॅम्प्लोना’ (encierro of Pamplona) असं नाव असलेल्या या शर्यतीत त्वेषाने धावणाऱ्या बैलांसमोर जीवाच्या आकांताने पळताना अनेक जणांना उत्साह वाटत असे.

हेही वाचा : नाद खुळा! दूध व्यवसायातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला दीड कोटींचा नफा..

Bailgada Sharyat विविध राज्यांत वेगवेगळी नावं :

महाराष्ट्रात या खेळाला शंकरपट म्हणूनही ओळखलं जातं. कर्नाटकात कंबाला, तामिळनाडूत रेकला, तर पंजाबमध्ये बौलदा दी दौड या नावाने ही शर्यत ओळखली जाते.

या शर्यतीवर बंदी का आली होती?

बैलांवर अन्याय होतो, या कारणाने बैलगाडा शर्यती बंद झाल्या नव्हत्या. तर बैलाचा समावेश पाळीव प्राण्यामध्ये केला जातो. पाळीव प्राण्यांना शर्यत किंवा प्रदर्शनात बंदी आहे, या कारणाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती, अशी माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues