Take a fresh look at your lifestyle.

‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा!

0

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना आहेत. त्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा घेण्याची पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी संधी आहे. मात्र यासाठी त्यांना 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे, पशुसंवर्धन विभागातर्फे याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वितरित करणे, शेळी-मेंढी गट वितरित करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वितरण व 25 अधिक 3 तलंगा गट वितरण, या सारख्या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे.

हेही वाचा : डीएपी की एनपीके? कोणतं खत बेस्ट? फायदे-तोटे काय?

इच्छुक https://ah.mahabms.com/webui/registration या संकेतस्थळावर किंवा एएच.एमएएचएबीएमएस मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करताना दुग्धालय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वंतत्रतणे निवड करण्याची सुविधा देखील आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. अर्जदारांनी एखाद्या योजनेसाठी एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करू नये. हे अर्ज 2025-26 वर्षापर्यंत वैध राहण्यासाठी प्रतीक्षायादी तयार करण्यात येणार आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याच्या पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर, मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ केले आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी मोबाईलचा जास्तीत-जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही, याची दक्षता घ्या.

अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues