Take a fresh look at your lifestyle.

Amazon Employee : स्वत:हून राजीनामा द्या मिळतील चांगले फायदे; अ‍ॅमेझॉनची भारतीय कर्मचाऱ्यांना दिली हि ऑफर

0

Amazon Employee यंदाच्या वर्षात ट्विटर, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, टेन्सेंट, HP सारख्या मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये अनेक कर्मचारांना कामावरुन काढण्यात आले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी सुद्धा 10 हजार कर्मचाऱ्यांना लवकरच कामावरुन कमी करण्याची घोषणा केली होती.

Amazon Employee जेफ बेजोस यांच्या घोषणेनंतर अ‍ॅमेझॉनने आता नोकर कपातीला सुरूवात केली आहे. कंपनीने त्यासाठी आता प्रक्रिया सुरू केली असून कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली नाही त्यांना काढून टाकले जाणार आहे. मात्र आता होणारी नोकरकपात ही ऐतिहासिक असणार आहे. हजारो लोकांच्या नोकऱ्या एकाचवेळी जाणार असल्यामुळे अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांना ऑफर देण्यास सुरूवात केली आहे.

Amazon Employee अ‍ॅमेझॉनने काय दिली कर्मचाऱ्यांना ऑफर?

अ‍ॅमेझॉनने आपल्या कर्मचार्‍यांना व्हॉलन्टरी सेपरेशन प्रोग्रॅम (VSP) पाठवत त्यांना स्वेच्छेने काम सोडण्याचे आवाहन केले होते. Amazon ने ले ऑफ पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 30 नोव्हेंबरची रात्री 3:30 वाजेपर्यंत ऑफरवर स्वाक्षरी करावी लागेल. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटूंबांवर हलाखीची वेळ आली आहे. या VSP मध्ये कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याच्या बदल्यात त्यांना काही फायद्यांचा लाभ मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Amazon Employee कर्मचाऱ्यांचा काय फायदा होणार?

कर्मचाऱ्यांनी ही ऑफर स्वीकारल्यानंतर त्यांना 22 आठवड्यांचे मूळ वेतन आणि प्रत्येक 6 महिन्यांच्या सेवेसाठी एक आठवड्याचे मूळ वेतन मिळेल. याची मर्यादा 20 आठवडे असणार असून यासोबतच कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांच्या विम्याचा लाभही मिळणार आहे. त्याउलट कामगिरीचा आढआवा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्यास त्यांना कंपनीच्या पूर्व-निर्धारित नियमांच्या आधारे पेमेंट केले जाईल. ज्याचे फायदे साहजिकच व्हीएसपी पेक्षा कमी असणार आहेत. यामुळेच अशी शक्यता आहे की अनेक कर्मचारी स्वत:हूनच राजीनामा देईल आणि पर्यायाने कंपनीला जास्त नोकरकपातीची वेळ येणार नाही. असे झाल्यास कंपनीची प्रतिमादेखील खराब होणार नाही.

दरम्यान, कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासंदर्भात भारत सरकारने कठोर धोरण स्वीकारले आहे. कामगार मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाला या प्रकरणी उपमुख्य कामगार आयुक्त, बेंगळुरू यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या युनियनने याचिका दाखल केली आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues