Take a fresh look at your lifestyle.

उसाची पाचट न जाळता जर जमिनीत कुजवली तर होतील हे फायदे…

0

शेतकरी बंधूंनो, सध्या सर्व भागात ऊसतोड चालू आहे जे की उसाचे फड रिकामे झाले की शेतकरी पाचट पेटवून देतात, खोडवा उसाची तयारी लगेच चालू होते. परंतु पाचट न पेटवता तुम्ही ते जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते यामुळे उत्पादनही चांगल्या प्रकारे निघते. पाचट कुजवल्या नंतर पर्यावरणाचे संवर्धन तर होणार आहेत त्याच बरोबर जमिनीची सुपीकता सुद्धा वाढणार आहे.

पाण्याची बचत अन् तणनियंत्रणही…
उसाची जर पाचट जाळली तर जमिनीसाठी जे की उपयुक्त घटक लागतात ते नष्ट होतात तसेच धुरामुळे वातावरण सुद्धा प्रदूषित होते आणि जर या पाचटची कुटी करून जर तुम्ही जमिनीत कुजवली तर जमिनीची पोत सुधारते. उन्हाळ्यात पाण्याचे जे बाष्पीभवन होते ते सुद्धा यामुळे रोखले जाते त्यामुळे पाण्याची बचतही होते. पाचट कुजवल्याने उसामध्ये पुन्हा तण ही लवकर येत नाही. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गांडूळ खत सुद्धा वापरले जाते.

असाही होतो पाचटाचा वापर…
उसाची तोडणी केल्यानंतर जी पाचट राहते ती जाळून तसेच फेकून न देता ज्या क्षेत्रावर उसाची लागवड करणार आहे त्या ठिकाणी पसरावे. मशीनच्याद्वारे पाचट ची कुटी करून ती कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सल्फेट फॉस्फेट खत टाकून पाणी द्यावे. हे सर्व झाल्यानंतर छोट्या ट्रॅक्टर च्या साहाय्याने रोटाव्हेटर फिरवल्याने पाचट जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळते तसेच उसाला मातीची भर देणे गरजेचे आहे.

पाचट कुजवण्याचे असेही फायदे :
एक हेक्टर जमिनीतून कमीत कमी ८ ते १० टन तर पाचट मिळतेच जे की या पाचटीमधून ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फूरद, १ टक्का पालाश तर ३२ ते ४० टक्के सेंद्रिय अर्ब मिळते म्हणजेच पाचटीमधून ४० किलो नत्र तसेच २०-३० टक्के स्फुरद आणि ७५ – १०० किलो पालाश मिळते. हे घटक भेटल्याने जमिनीची पोत तर सुधारते तसेच उत्पादन ही चांगल्या प्रकारे निघते. उसाची पाचट जाळल्याने वातावरणाचे प्रदूषण तर होते त्यापेक्षा न जाळता कुजवली तर जमिनीची सुपीकता वाढवते आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues