Take a fresh look at your lifestyle.

फायद्याची शेती ‘कोरफडची शेती’ करताना ‘या’ बाबी लक्षात ठेवा!

0

अलीकडे कोरफडची शेती ही लोकप्रिय होत चाललीय. कारण हि शेती ही खूप फायदेशीर आहे. अनेक शेतकरी हि शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत. असे असले तरी भारतात कोरफडच्या विक्रीसाठी चांगला मार्केट उपलब्ध नाही.

गेल्या काही वर्षांपासून कोरफडच्या प्रॉडक्टची संख्या मात्र वाढली आहे. यात कॉस्मेटिक, ब्युटी प्रॉडक्टसपासून ते खाण्या पिण्याच्या हर्बल प्रॉडक्ट आणि टेक्सटाईलचा समावेश आहे. एकंदरीत कोरफडची मागणी वाढली तरी अजूनही बऱ्याचश्या शेतकऱ्यांना कोरफड विक्रीविषयी पुरेशी माहिती नाही. चला तर आज याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

कोरफड दोन प्रकारे विकली जाऊ शकते :

  1. कोरफडची पाने
  2. कोरफडचा पल्प (gel)

कोरफडची शेती करणारे बहुतांश शेतकरी अगोदरच एखाद्या कंपनीशी करार करतात. त्यानुसार त्यांचे पीक तयार झाल्यानंतर ती कंपनी त्यांच्याकडून कोरफडची पाने खरेदी करते. काही शेतकरी असे आहेत ज्यांनी कोरफडसाठी प्रोसेसिंग युनिट देखील उभारले आहेत. त्यामध्ये ते स्वतः कोरफडचा पल्प काढून कंपनीना कच्च्या मालाच्या स्वरूपात विकतात.

कोणत्या कंपन्याना कोरफडची आवश्यकता असते?

● पतंजली, डाबर, बैद्यनाथ, रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्या
● काही छोट्या कंपन्या कोरफडचा पल्प काढून इतर मोठ्या कंपनीना प्रोव्हाईड करतात.
● एलोवेरा हेल्थकेअर, कॉस्मेटिक आणि टेक्सटाईलमध्येही वापरला जातो.

सुरुवातीला कराराची शेती करून शेती करणे फायद्याचे ठरते. कारण कंपन्या थेट शेतकऱ्याकडून कोरफडची पाने किंवा पल्प खरेदी करतील. मात्र हे शेतकरी आणि कंपनी यांच्यातील करारावर अवलंबून असते. शेतकरी लगदा पल्प स्वत: काढू शकतात किंवा स्वतः प्रॉडक्ट तयार करून थेट काम देखील करू शकतात. पल्प काढून विकला तर 4 ते 5 पट अधिक नफा मिळतो.

‘या’ संस्था प्रशिक्षण देतात :
● केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती (सीआयएमएपी) कडून कोरफडचे प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात असते.
● सीएसआयआर-मध्यवर्ती औषधी व सुगंधी वनस्पती देखील प्रशिक्षण देते. संबंधित राज्यातील विविध संस्था वेळोवेळी प्रशिक्षण देत असतात.

असा आहे अनुमाणित खर्च व उत्पन्न :

  1. पहिल्या वर्षात एकरी अंदाजे 80 हजार ते 1 लाख इतका खर्च येतो.
  2. कोरफडची पाने प्रति किलो 4 ते 7 रुपयांना विकली जातात. मात्र हा दर शेतकरी आणि कंपनी यांच्यातील करारावर अवलंबून असतो.
  3. रोपवाटिकामध्ये प्रत्येक रोप 3 ते 4 रुपयेमध्ये उपलब्ध असते.
  4. लगद्याची अंदाजित किंमत 20 ते 30 रुपये प्रति किलो असते.
  5. संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने शेती केली गेली तर तज्ञांच्या मते एका एकरात सुमारे 15 हजार ते 16 हजार झाडे लावली जातात.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.