Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Air India : किस्साच आहे बुवा! एअर इंडियाच्या विमानात निघाला साप; प्रवाशांमध्ये खळबळ

0

Air India साप म्हटलं की सर्वांचीच घाबरगुंडी उडते. आता चक्क एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात साप आढळल्यानं प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. एअर इंडिया एक्स्प्रेसचे केरळहून निघालेले विमान शनिवारी दुबई विमानतळावर उतरले. तेव्हा त्याच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळला. यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. विमान वाहतूक नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. आता डीजीसीएकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Air India मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट क्रमांक B737-800 मध्या साप आढळली. हे विमान केरळमधील कालिकत येथून दुबई विमानतळावर पोहोचलं. विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळल्यानं प्रवासी घाबरले. सुदैवानं सापामुळं कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

Air India डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दुबई विमानतळावर पोहोचल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. प्रवाशांच्या हे लक्षात येताच प्रवासी घाबरले. विमानात साप आढळल्याची माहिती विमानतळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे विमान ग्राउंड स्टाफच्या ताब्यात देण्यात आलं.

IPhone In India : कधी विचार केलाय का, भारतात Iphones महाग का? ही आहेत कारणे

विमानात साप आढळल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी या वर्षाच्या सुरुवातीला 10 फेब्रुवारी रोजी मलेशियाला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानातही साप आढळून आला होता. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर प्रवाशांना विमानामध्ये काहीतरी रेंगाळत असल्याचं दिसलं. त्यानंतर विमानात साप असल्याची बाब प्रवाशांच्या लक्षात आली. विमान कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. सर्व विमान प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews