Take a fresh look at your lifestyle.

Agriculture E-commerce : कामाची बातमी..!! शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार शेतीपूरक औषधे

0

Agriculture E-commerce देशात सध्या मोबाईलचे युग सुरू असून आता सर्व काम हातात असलेल्या एका छोट्याशा मोबाईलच्या माध्यमातून केली जात आहेत. अगदी पैशांची देवाण-घेवाण करण्यापासून ते इतर कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यापर्यंत सर्व कामे मोबाईल मधून ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या करता येतात. यासर्व गोष्टी लक्षात घेता आता केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.

Agriculture E-commerce केंद्र सरकारचा तो निर्णय म्हणजे आता शेतकऱ्यांना घरबसल्या शेतीपूरक सर्व औषधे मिळणार आहेत. शेतकऱ्यांना आता कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. कारण आता अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या अनेक ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून कीटकनाशकांची विक्री होणार आहे. यासाठी केंद्र शासनाने कायद्यात धोरणात्मक बदल केला आहे.

हेही वाचा : युरिया खरेदीसाठी मिळवा 2700 रुपये सबसिडी, योजनेचा असा घ्या लाभ

Agriculture E-commerce एवढेच नव्हे तर कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व प्रकारची कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना विकू शकतील. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असणार आहे.

Agriculture E-commerce दरम्यान, कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवल्यास शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून शेतकऱ्यांना चांगली कीटकनाशके देखील उपलब्ध होतील. ही कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जावं लागणार नाही. घरपोच त्यांना कीटकनाशके मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues