Take a fresh look at your lifestyle.

Aadhaar Card Update : आता मोफत करता येणार आधार कार्ड अपडेट, ‘या’ स्टेप्स फॉलो करा

0

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. UIDAI ने आधार अपडेट करण्याचे शुल्क रद्द केले आहेत. मात्र तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत. आधार धारकांना तीन महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. तुम्ही 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 पर्यंत आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करु शकतात.

तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड ऑफलाईन अपडेट करायचे असेल तर आधार सेंटरवर जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला ठराविक शुल्क भरुन आधार अपडेट करावं लागेल. मात्र आधार अपडेट करायला जाताना फोटो, नोंदणीकृत मोबाईल नंबर घेऊन जावे लागेल.

असे करा ऑनलाईन आधार कार्ड अपडेट :

प्रथम आधार क्रमांकाद्वारे https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर लॉग इन करा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल तो अपलोड करा.

नंतर ‘Document Update’ वर क्लिक करा.

पुढे तुमची अपडेटेड माहिती भरा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues