Take a fresh look at your lifestyle.

आपल्या लाडक्या बैलासाठी ‘काय पण’

0

शेतकरी त्यांच्या पाळीव प्राण्यांवर किती प्रेम करतो? याबद्दल फार काही वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतकऱ्याच्या जीवनात बैलजोडीला किती वेगळंच स्थान असतं? हे अधोरेखित करणारी एक घटना पुण्यात घडली आहे.

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात वडगाव गावात राहणाऱ्या शंकर पाटोळे यांच्या लाडक्या बैलाचा नुकताच मृत्यू झाला. यानंतर पाटोळे यांनी बैलाचा दशक्रिया विधी कार्यक्रम केला. एवढेच नाही तर बैलाची आठवण कायम राहावी म्हणून घरासमोर हुबेहूब बैलाचा पुतळा देखील उभा केलाय. त्यांच्या कुटुंबियांचे बैलाबद्दलचे असणारे विशेष प्रेम पाहून सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.

पाटोळे यांच्या गाईला २८ वर्षांपूर्वी खोंड झाले. त्याचे नाव त्यांनी शेलार असे ठेवले. हे खोंड त्यांच्या कुटुंबाचा एक महत्वपूर्ण भाग बनले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मग त्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन बैलाची आठवण स्मरणात राहावी म्हणून घरासमोर त्यांच्या बैलाचा शेलारचा पुतळा बांधला. पाटोळे कुटुंबियांचे बैलावरील प्रेम बघून असे समजले की बळीराजा शेतकऱ्यासाठी त्यांचा बैल किती महत्वपूर्ण असतो.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues