YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत?

नील मोहन हे टेक उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी नवीन सीईओ होण्यापूर्वी ते YouTube चे मुख्य प्रॉडक्ट अधिकारी होते.

मोहनने 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली, जिथे तो आर्जे  मिलर स्कॉलर (टॉप 10 मेरिट धारक) बनले.

त्यांनी 2005 मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आणि 1996 मध्ये अॅक्सेंचरमधून त्यांच्या करिअरला सुरुवात केली.

त्यानंतर तो नेटग्रॅव्हिटी नावाच्या स्टार्टअपमध्ये सामील झाला जो नंतर डबलक्लिक अॅडव्हर्टायझिंगने विकत घेतला.

2007 मध्ये, DoubleClick Google ने विकत घेतले आणि ते Google च्या वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले.

मोहनने Google AdSense प्रोजेक्टमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, जे आज जगातील सर्वात यशस्वी जाहिरात प्लॅटफॉर्म आहे.

एकेकाळी त्याला Twitter कडून मोठी ऑफर आली होती पण Google ने त्याला $100 दशलक्ष बोनस देऊन रिटेन केले. 

मोहन 2015 मध्ये यूट्यूबवर रुजू झाले आणि आता त्यांनी यूट्यूबचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आहे.

अश्याच प्रकारच्या नवनवीन वेब स्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा