Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर

0

गेल्या आठवड्याभरात राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. या सगळ्याची दखल घेत मोदी सरकारनं राज्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

नेमके घोषणा काय? :

▪️ पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 700 कोटींची मदत केंद्राकडून जाहीर करण्यात आली असून याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.

▪️ गेल्या आठवड्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याच अधिवेशनात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली.

▪️ दरम्यान,विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पाचव्या दिवशीसुद्धा सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाज थांबवावे लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.