Take a fresh look at your lifestyle.

Vijay Diwas : 16 डिसेंबर हा दिवस भारतासोबत या देशात देखील विजय दिवस म्हणून करतात साजरा..!!

0

16 डिसेंबर 1971 मध्ये झालेले भारत-पाकिस्तान युद्ध (india vs pakistan 1971 war) हे आजही जागतिक इतिहासात कोरलं गेले आहे. विजय दिवस (vijay diwas) साजरा करण्याची सुरुवात हि 16 डिसेंबर 1972 पासून झाली. भारताने 1971 मध्ये 16 डिसेंबर याच दिवशी पाकिस्तानी सैन्याला युद्धामध्ये धुळ चारली होती. परंतु आजही अनेकांना भारत हा दिवस का साजरा केला जातो? कदाचित हेच माहिती नाही. आपण पुढील लेखात जाणून घेऊया या दिवसाचा संपूर्ण इतिहास

काय आहे या दिवसाचा इतिहास? (What is the history of this day?)

भारताचे आणि पाकिस्तानचे हे युद्ध 3 डिसेंबर 1971 या दिवशी सुरु झाले. आणि अखेर 13 दिवसांनी पाकिस्तानचा युद्धात पराभव झाला. पाकिस्तानी आर्मीचे त्यावेळचे जनरल ए.के.नियाजी हे 90 हजारपेक्षा जास्त सैन्यबळ घेऊन भारतावर चाल करुन आले होते. आणि यामुळेच 1971 च्या युद्धाला तोंड फुटले. त्यावेळी पुर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान याच्यात फुट पडली होती. भारताने पुर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांग्लादेश (bangladesh) यास आपला पाठींबा दर्शवला. आणि अखेर 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला.

हेही वाचा – एअरटेलचा ‘हा’ प्लॅन घ्या आणि संपूर्ण वर्षाची चिंता सोडा!

हीच बाब पाकिस्तानला पटली नाही आणि पाकिस्तान आर्मीने भारतावर चालून येण्याचा पवित्रा घेतला. मात्र या युद्धात पाकिस्तानला हार मानावी लागली. जवळपास 13 दिवसांच्या युद्धानंतर 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेशातील ढाका येथे पाकिस्तानी सैन्याने भारतीय आणि बांगलादेशी सैन्यासमोर शरणागती पत्करली. या युद्धात भारताचे 3900 वीर धारातीर्थी पडले, तर 1851 वीर जखमी देखील झाले.

भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या या अभुतपूर्व विजयामुळे 16 डिसेंबर हा दिवस भारतासोबत बांगलादेशामध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues