12th exam time table 2023 : उद्यापासून बारावीची लेखी परीक्षा सुरु, असे करा एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड
12th exam time table 2023 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 या काळात होईल, तर दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 ते शनिवार 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडतील.
यावर्षीच्या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असून पेपर सोडविण्यासाठी अतिरिक्त वेळ देखील नसणार आहे. विद्यार्थ्यांनी अतिदक्षता म्हणून अद्यापही पेपरचे वेळेपत्रक डाउनलोड केले नसेल तर https://mahahsc.in/notification/hsc-timetable-2023-gen&bifocal.pdf या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक डाउनलोड करता येणार आहे..
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 108 केंद्र संख्या असून 63313 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे 2021 ची दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. 2022 मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, 25 टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 2023 ची परीक्षा 2020 मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे.