Take a fresh look at your lifestyle.

पोल्ट्री व्यवसाय करताय? आता “ही” परवानगी बंधनकारक असेल

0

पोल्ट्री व्यवसाय (Poultry business) अर्थात कुक्कुटपालन करताना आता आणखी एक परवानगी घ्यावी लागेल. प्रदूषण नियंत्रण मंडळासह आता सरकारची (Gov) परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आली आहे. यापूर्वी ग्रामीण भागात असणारा हा व्यवसायाला ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत स्तरावर ना हकरत दाखल मिळाला की व्यवसाय करण्यास परवानगी मिळत होती.

मात्र, आता हरित लवादात गौरी माउलीखी यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार पाच हजार अधिक प्रकल्प असलेल्या प्रकल्पाला विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या सूनावणीत हरित लवादाने याबाबत निकाल दिला. त्यानुसार पोल्ट्री व्यवसायासाठी (Poultry business) प्रदूषण नियंत्रण (pollution control) मंडळासह सरकारची परवानगी बंधनकारक असणार आहे. याशिवाय पाच हजारांहून अधिक पक्षी असलेले व्यावसायिक या अधिकार कक्षेत ठेवण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सविस्तर आदेश जारी केले आहेत. नवीन वर्षात या आदेशाची अंमलबजावनी सुरू होणार आहे.

ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून अनेकदा शेतकरी पोल्ट्री व्यवसाय (Poultry business) अर्थात कुक्कुटपालन करतात. शेती व्यवसायात जर कधी नुकसान झाले तर कधी-कधी शेतीपूरक असलेला पोल्ट्री व्यवसाय आधार बनतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पोल्ट्री व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलाय. बर्ड फ्ल्यू आणि त्यानंतर आलेल्या कोरोनाने पोल्ट्री व्यवसाय करणारा शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, हाच पोल्ट्री व्यवसाय करत असतांना आता पोल्ट्री व्यवसायकाला बंधने घालण्यात आली आहे आणि त्याचे पालन करावे लागणार आहे.

पाच हजारांपेक्षा अधिक पक्षी असलेल्या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी बंधनकारक असेल. याशिवाय कुक्कुटपालन प्रकल्प उभारताना लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब प्रकल्प असावा लागणार आहे. तसेच, नदी-नाल्यापासून दूर असावा, असं देखील सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues