शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस का घटत आहे?
शेतकरी बंधूंनो, आज आपण कोणतेही पीक लावले तरी पिकाची जोमदार वाढ झाल्याचे दिसत नाही. पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ति दिसत नाही,पिकांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे चांगले उगवत नाही व रोपे मातीत तग धरत नाहीत. कडधान्य, भाजीपाला, तसेच नगदी पिकांच्या उत्पादनात सातत्य टिकवणे तसेच फळबागांना आलेल्या नवनवीन रोगांचा सामना करण्यात शेतकरी पुरता नाकीनऊ येतोय.
या सगळ्या गोष्टींचे कारण विचारले तर तुम्ही म्हणाल कि, जमीन आता आधीसारखी ‘कसदार’ राहिली नाही. परंतु हे का होतंय? जमिनीचा कस का कमी होतोय? शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस का घटत आहे? याचा आपण कधी विचार केलाय का? जर आपण सगळ्या पिकांना खते, औषधे आवश्यक प्रमाणात टाकतोय तरीही उत्पन्न कमी का होत आहे? चला बघूया…
मातीला असलेला काळा रंग हा सेंद्रिय कर्बामुळे (Oragnic Carbon) असतो. ह्युमस (Humas) म्हणजेच ओरगॅनिक कार्बन होय. सजिवांचे म्हणजेच मानव, वनस्पति, प्राणी सर्वच यांचे संतुलित पोषण होण्यासाठी एकुण ७५ मुलद्रव्य घटकांची गरज असते. ७५ पैकी १६ (१८) मुलद्रव्यांची प्रामुख्याने गरज असते.
मुख्य मुलद्रव्ये (Primary Nutrients): (नायट्रोजन, फॅास्फोरस, पोटॅश ).
दुय्यम मूलद्रव्ये (Secondary Nutrients): ( कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर )
नैसर्गिक घटक (Naturally Available Nutrients) : (कार्बन, ऑक्सिजन,व हायड्रोजन)
मायक्रोन्युट्रिएन्ट (Micro- Nutrients) : कॅापर ,झिंक, बोरान,फेरस, मँगेनिज, मॅालीब्डेनम व क्लोरिन/निकेल/ कोबाल्ट) ही आहेत.
पिकाची सदृढ वाढ होण्यासाठी 16 मुलद्रव्यांचे ठराविक प्रमाणच लागत असते. परंतु आज आपण या ठराविक प्रमाणासाठीच खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. पुर्वजांनी शेकडो वर्ष शेती करूनही जमिनीची उत्पादन क्षमता टिकवून ठेवली कारण त्यांचे 100% पोषण हे सेंद्रिय घटकांवर अवलंबुन होते. सेंद्रिय घटकांमधून भरपूर सेंद्रिय कार्बन उपलब्ध होत असे. त्यानेच नैसर्गिक घटकांचे (कार्बन) मोठ्या प्रमाणात पुनर्भरण केले जायचे.आज आपण हेच 94% पोषण निसर्गावर सोडुन पर्यावरणाला व नशिबाला दोष देतो आहे. हा जमिनितील सेंद्रिय कार्बन सुपिक मातीतील जिवाणुंचा (Micro-Oragnisms) प्रमुख स्त्रोत आहे.
हेच जिवाणू पिकाच्या शोषण प्रक्रियेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत.पूर्वीच्या शेतकऱ्यांना हे रहस्य माहित होते. ते जमिनिचा कस (ह्यूमस) टिकवुन ठेवत व हजारों वर्ष समृद्ध शेती करत आले. पूर्वजांकडे जमिनिचा कस टिकविण्याचा उत्तम मार्ग होता तो म्हणजे कसदार चारा खाऊन तयार झालेले देशी जनावरांचे वर्षभर साठवलेले कंपोष्ट खत (शेणखत). आताच्या संकरीत जनावरांच्या शेणात सेंद्रिय कार्बन खुप कमी आहे कारण ते जास्तीत जास्त कस शोषुन घेण्यासाठी व केवळ जास्तीच्या दुध उत्पादनासाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या शेणात चोथाच जास्त असतो. त्यामुळे उपयुक्त जिवाणू कमी आणि हानिकारक बूरशीची वाढच जास्त होत आहे. जर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर नैसर्गिकरित्या जास्तीत जास्त सेंद्रिय कार्बन कसा तयार करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा