Take a fresh look at your lifestyle.

बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची माहिती; ‘ही’ व्यवसायिक कर्ज योजना देईल आधार

0

कोरोना महामारीमुळे सध्या संपूर्ण देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीआहे. खास अशा बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या विविध व्यवसायिक कर्ज योजना उपलब्ध आहेत. याची मदत घेऊन ते आत्मनिर्भर होऊ शकतात. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात….

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. जे युवक व्यवसाय करू इच्छित आहे त्यांना या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करण्याच्या प्रकल्पासाठी जे कर्ज काढायचे आहे त्या प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. शिवाय शासकीय अनुदान मिळत असल्यामुळे व्यवसाय कर्ज भरण्यास सोपे देखील जाईल.

या योजनेच्या माध्यमातून बँकेकडून मिळालेल्या कर्जावर 35 टक्के सबसिडी किंवा जास्तीत-जास्त 10 लाख रुपये अनुदान मिळते.

या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या पिकांचे जास्त उत्पादन घेतले जाते या पिकांच्या संदर्भातील उद्योग उभारण्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. फळबागा असलेल्या जिल्ह्यांमध्ये फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाईल.

असा करा योजनेसाठी अर्ज कसा करावा? :

● सर्वप्रथम MOFPI या संकेत स्थळावर जा.
● आता व्यवसाय उभारणी इच्छुक तरुणांनी किंवा शेतकऱ्यांनी व्यवसायिक कर्जासाठी त्यावर मिळणाऱ्या अनुदानासाठी रजिस्ट्रेशन करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवा.
● त्यानंतर पुन्हा वरील वेबसाईटवर जाऊन एम बी रजिस्ट्रेशन करू शकता.
● योजना आणि प्रकल्प संदर्भातील माहिती व्यवस्थित वाचून घेऊन ऑनलाईन अर्ज करा.
● ऑनलाइन अर्ज करताना तुमच्या तालुक्यातील आत्मा अधिकारी यांचीदेखील तुम्ही मदत घेऊ शकता.
● जर परिपूर्ण सादर करता आला नाही तरी काळजी करू नका.
● कारण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा पातळीवरील एक किंवा अनेक तज्ज्ञांची नियुक्ती केलेली असते.
● या तज्ञांचे काम असते की, ज्या कोणा तरुणांना अर्ज करण्यास अडचण येईल त्यांना संपूर्ण मदत करणे एवढेच नाही तर प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल कसा तयार करावा? उद्योग आधार कसे काढावे? आदी बाबींची संपूर्ण मदत ही नियुक्त तज्ञांकडून केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.