Take a fresh look at your lifestyle.

पर्वतरांगांमधील खास गाय ‘डांगी’ गाय…!

0

आज आपण या लेखाच्या माध्यमातून “डांगी” या गायीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याकडे विशेषतः पर्वतरांगांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. तसेच पर्जन्यकाळ अधिक कालावधीचा असतो. अशा ठिकाणी शेतीमधील काम समर्थपणे करणारी गाय म्हणून “डांगी” गाय सर्वात चांगला पर्याय आहे.

पर्वतरांगामधील गाय यावरून या गायीला “डांगी” हे नाव पडल्याचे सांगितले जाते. अतिशय दुर्गम डोंगरात चरणे, मोठ्या पावसामध्ये शेतीची कामे करणे, भातलावणीचे वेळी रेड्यांप्रमाणे उत्तम चिखलणी करणे ही या गायीच्या बैलांची वैशिष्टये आहेत.

महाराष्ट्रामधील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कवळण व या जिल्ह्यातील पश्चिमेकडील प्रदेश; तसेच ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये आणि अहमदनगर जिलह्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्यांचे जवळील प्रदेशामध्ये या गायीचा चांगल्या पद्धत सांभाळला होतो व ती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.

ही गाय लहानसर हे मध्यम ठेवणीची आहे. स्थानिक निसर्गाशी जुळवून घेणारा तिचा वंश आहे. या गायीच्या कातडीखाली तैलग्रंथीचा हलका स्तर असतो. यामुळे मोठ्या पावसामध्ये गायी/बैल भिजले तरीही पाणी अंगात मुरत नाही व आजारपण येत नाही. हे या गायीचे सर्वात मोठे नैसर्गिक वरदान आहे.

या गायीचा रंग म्हणजे काळ्या रंगावर पांढरे ठिपके व पांढऱ्या रंगावर काळे ठिपके असा असतो. या रंगाच्या मिश्रणानुरुप स्थानिक परिभाषेत सहा प्रकारे संबोधला जातात. १) काळाबाळा २) पांढराबाळा ३) मणेरी ४) लालबाळा ५) लाला ६) बाळा.

या कोंबडीच्या जातीपासून मिळते सर्वात जास्त अंडी | पोल्ट्री, कुक्कुटपालकांनी नक्की बघा | Krushi Doot

भाद्रपद महिन्याचा माजरीचारा खाऊन ही जनावरे पुष्ठ झाली की या गायीला विलक्षण चमक प्राप्त होते. या गायीच्या कपाळाची ठेवण नजरेत भरेल अशी असते. कपाळाच्या अगदी मधोमध लहानसर उंचवटा असतो, शिंगे लहान दंडगोलाकृती किंचीत मागे झुकलेली व संपूर्णपणे काळ्या रंगाची असतात. नाकपुडे संपूर्णतः काळी व मध्यभागी फुगीर असते, खांदे अतिशय भक्कम, वशिंड लहानसर आकाराचे पण घट्ट असतात, पाय उंचीने जरा लहानसर, खूप एकसंघ लहान परंतु अत्यंत टणक व संपूर्णतः काळे असतात.

गायीच्या या गुणांमुळेच उंच डोंगरांमध्ये अवघडजागी जाऊन चरणे या गायीला सहज शक्य होते. कान लांबट गोलाकार असतात, डोळे गोटीसारखे चकचकीत, कास लहानसर व गोलाकार असते. बहुतांशी कास पांढऱ्या रंगाची व चारही सड (आचळ) काळ्या रंगाचे लहानसर, छातीकडून कासेकडे येणारी दूधाची शिर लहान आकाराची व सरळ असते, शेपूट सर्वसाधारण उंचीची गोंडा काळा झुपकेदार असतो, बैलांचे चौक उंचीला शोभतील असे असतात. या बैलांमध्ये शेतीकामाची चिकाटी व ताकद दिसते. त्यामुळे सलग ५ ते ६ तास सुद्धा अडचणीच्या उताराच्या खाचरांमध्ये उखळणी व चिखलणीची कामे ते सहज करताना दिसतात.

गायीच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय साधारणपणे ३६ ते ४४ महिन्यांचे असते. मेहनत घेतलेल्या कालवडी ३० ते ३२ महिन्यांच्या माजावर येऊन गाभण राहिल्याच्या गोशाळांमध्ये नोंदी आहेत. या गायींच्या दोन वेतांमधील अंतर २० ते २४ महिन्यांपर्यंत असते. तसेच संपूर्णत: भाकडकाळ ९ ते १० महिन्यांचा देखील असू शकतो. या गायीच्या गायी उत्तमप्रकारे चरल्यावर अगदी नगदी खाणे नसले तरीही दिवसाकाळी ३ ते ४ लिटर दूध सहज देतात.

या गायींच्या दुधामधील स्निग्धांशाचे प्रमाण ३ ते ३.५% पर्यंत एवढे असते. या गायीपासून संकर केलेल्या जर्सी/होल्स्टीन ५०% पर्यंतच्या कालवडी उत्तम गुणवत्तेच्या व दुधाळ असल्याचे सिद्ध झाले आहे. वयाची ४ वर्षे पूर्ण झाली की खोंडे शेतीकामासाठी योग्य ठरतात. सध्या या गायीवर नाशिक व ठाणे जिल्ह्यांच्या सरकारी गोशाळा किंवा खाजगी गोशाळांमध्ये चांगल्या प्रकारे उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने संशोधनात्मक प्रयत्न सुरु आहेत.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues