Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

किटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी? वाचा!

0

पिकांवर विविध रोग व किड रोखता यावी यासाठी फवारण्या कराव्या लागत असतात. या पार्श्वभूमीवर आज आपण किटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी? याबाबत जाणून घेऊयात…

किटकनाशके खरेदीवेळी काय काळजी घ्याल? :
▪ किटकनाशके नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा.
▪ नोंदणी क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, अंतिम तारीख आदी गोष्टी काळजीपूर्वक तपासा.
▪ किटकनाशकांवरील लेबल नीट तपासा, डब्यातून किंवा पॅकेटमधून गळती होत असेलेली किटकनाशकं घेऊ नका.

किटकनाशकांची साठवणूक करताना : किटकनाशके नेहमी कुलूपबंद ठिकाणी व लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा. भाजीपाला तसेच फळांच्या सोबत किंवा खाद्यपदार्थांसोबत किटकनाशके ठेऊ नये किंवा त्यांची वाहतूक करू नये.

किटकनाशकांचे मिश्रण करताना : औषध बनवण्याची पद्धत, किटकनाशकाची मात्रा, लेबल क्लेम बघूनच द्रावण तयार करा. फवारणीसाठी आवश्यकतेनुसार योग्य नोझलची निवड करावी. मिश्रण हाताने तयार न करता त्यासाठी काठीचा वापर करा.

फवारणी करताना ‘हे’ करा! :
▪ फवारणीसाठीचे द्रावण पंपात भरताना नरसाळे वापरा, गळक्या पंपाचा वापर करणे टाळा.
▪ किटकनाशक व तणनाशक यांच्या फवारणीसाठी एकाच पंपाचा वापर करू नका
▪ फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करणे टाळा.
▪ मिश्रण तसेच फवारणी करताना व्यक्तिगत संरक्षणासाठी सुरक्षा किट वापरा.
▪ फवारणी झाल्यावर उरलेल्या द्रावणाची योग्य विल्हेवाट लावा.
▪ फवारणी झाल्यावर अंघोळ करावी तसेच सुरक्षा किट देखील धुवा.

फवारणीदरम्यान विषबाधेची लक्षणे काय? : डोळे व त्वचेची जळजळ होणे, डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, उलटी, मळमळ, धाप लागणे घाम फुटाणे इत्यादी.

विषबाधेवर प्रथमोपचार काय? : त्वचा किंवा डोळ्यांशी किटकनाशकांचा संपर्क आल्यास त्वचा व डोळे 15 मिनिटे स्वच्छ पाण्याने धुवा. तोंड किंवा नाकाद्वारे किटकनाशके शरीरात गेल्यास किटकनाशकांचे लेबल घेऊन त्वरित डॉक्टरांकडे जा.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews