Take a fresh look at your lifestyle.

उत्पादन वाढेल चार पटीने; वापरा मल्टी लेअर फार्मिंग

0
आपला भारत देश कृषिप्रधान देश असल्याने जवळपास निम्या पेक्षा अधिक लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. भारतात शेतीवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन नेहमीच चालू असते? शेती कशा प्रकारे करावे? आधुनिक पद्धतीने करावी की अजून कोणत्या पद्धतीने? यावर काम करणारे अनेक इन्स्टिट्यूट सध्या उभे आहेत. त्यातूनच लागलेला सर्वोत्तम शोध म्हणजे मल्टी लेअर फार्मिंग. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

मल्टी लेयर फार्मिंग म्हणजे काय? फायदा काय? :
● सोप्या भाषेत सांगायचे तर बहूस्तरीय पीक म्हणजेच एकाच वेळेस अनेक पिकांची लागवड करणे होय.
● यामध्ये शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळत असल्याने बहुतांश शेतकरी या पद्धतीचा वापर करतात.
● या फार्मिंगमुळे पाणी, वीज, श्रम, खर्च कमीच होत नाही तर जास्तीत-जास्त नफा देखील शेतकऱ्यांना होतो.

मल्टी लेअर फार्मिंगचे काम असे असते?
● यासाठी अगोदर तीन चार पिकांची निवड करावी लागते.
● यात जास्त कालावधीचे पीक घ्या जसे की ऊस,डाळिंब, सिताफळ यांसारख्या फळांची लागवड. कारण त्यातूनच त्यामध्ये भाजीपाला लावणे जशी की मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांची निवड करणे यामुळे लोकांना दुप्पट-तिप्पट घेऊन चांगला फायदा होतो.
● श्रम पाणी खर्च यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही.
● यात जास्त कालावधीचे पीक घेतले तर त्यामध्ये आपण कालांतराने कमी कालावधीचे पिकामध्ये बदल करू शकतो. यालाच मल्टी लेअर फार्मिंग म्हटले जाते.
● यात एकाच वेळी चार पिके घेतल्यामुळे जमीनही वाचते आणि प्रत्येक पिकाला वेगवेगळे पाणी द्यावे लागत नाही यामुळे पाणीही वाचते.

जर तुम्ही मनापासून व्यवस्थित मल्टी लेअर फार्मिंग केली तर तुम्हाला नियमित नफ्या पेक्षा चार ते आठ पट नफा जास्त मिळू शकतो. यामुळे खर्च कमी आणि नफा अधिक होतो. यामुळे एका पिकाला व्यवस्थित पोषक मिळाले तर तेच पोषण दुसऱ्या पिकालाही मिळते.

भारीच ना, चला मग ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.