Take a fresh look at your lifestyle.

असे ठेवा शेवगा लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापन!

0

भरघोस उत्पादन देणारे व कमी खर्चिक पीक शेवगा हे भाजी या प्रकारात मोडते. याला देश-विदेशातून चांगली मागणी असते. आज आपण शेवगा लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापन कसे असावे? याबाबत माहिती पाहूयात…

जमिनीचा प्रकार : हलक्या ते भारी, माळरान, डोंगरउताराच्या जमिनी, चोपण जमिनीत.

हवामान : हे सर्व हवामानात येणारे पीक असून याची सर्वसाधारण २५ ते ३० से. तापमानात वाढ चांगली होते.

पिकाची जात : कोईमतूर १,२, कोकण रुचिरा, पि.के एम -२

लागवड : पावसाळी लागवड करण्यापूर्वी ६०X६०X६० सेमीचे खड्डे करून घ्या. बहूवार्षिक लागवडीसाठी ४x ४ मीटरवर लागवड करा. १ वर्षीय वाणांसाठी २.५ x २.५ सेमी वर लागवड करा.

असे करा खत व्यवस्थापन : सर्वप्रथम खड्ड्यात १ घमेले कुजलेले शेणखत, २५० ग्रॅम सुफला व ५० ग्रॅम फोलिडोल पावडर टाकून खडे भरून घ्या. तसेच दरवर्षी प्रति झाडाला १० किलो शेणखत, ४७० ग्रॅम सुपर फोस्फट, १२५ ग्रॅम म्युरेट ही खते द्यावी.

पाणी व्यवस्थापन कसे असावे? : जमिनीच्या मगदूरानुसार पाणी द्या. तसेच फुल व शेंगा लागणीच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्या.

रोग नियंत्रण : शेवगा पिकावर जास्त किडी रोग पडत नाहीत. परंतु जैविक कीटकनाशकांचा आणि सौम्य रासायनिक औषधाचा वापर करा.

उत्पादन : लागवड केल्या नंतर साधारणतः 6 महिन्यानंतर शेंगा लागतात. शेवगा शेंग रसरशीत असतानाच तोडणी करा. खूप टणक झाल्यास शेंगाची चव कमी होते. लागवड केल्यापासून ८ ते १० महिन्यांनी शेंग काढणीस येते.

——————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

——————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues